समानार्थी शब्दांची यादी – ‘य’ पासून ‘श’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द समानार्थी शब्द
यत्न खटपट, परिश्रम
यद्यपि जरी
यमराज यम, मृत्यूदेवता, कृतांत, काल, श्राद्धदेव, पितृपती
यातना कष्ट, हाल, अपेष्टा
यातायात त्रास, श्रम, कष्ट
युक्ती चातुर्य, कल्पना, शक्कल
युगूल जोडी, जोडपे
युती संयोग, मिलाफ
येरझारा चक्कर, फेरी, खेप
योग संधी
योगक्षेम उदरपोषण, चरितार्थ, निर्वाह, उपजीविका
योग्य उचित, ठीक, यथार्थ, बरोबर, खरे, वास्तविक
योद्धा वीर, शूर, विक्रांत, पराक्रमी, लढवय्या
यःकश्चित सामान्य, क्षुद्र, गौण
रक्कम रोकड, मालमत्ता, द्रव्य
रक्त रुधिर, असूद, शोणित
रग मस्ती, गुर्मी, ताठा, मग्रूरी, मुजोरी
रगड विपुल, मुबलक, खूप, गडगंज, चिकार, भरपूर
रजक धोबी, परीट
रणगाजी पराक्रमी, शूर, रणझुंजार, लढवय्या
रथी योद्धा (रथातून लढणारा)
रसहीन कोरडा, सुका, द्रवहीन
रसज्ञ रसिक, मर्मज्ञ
रस्ता वाट, पथ, पंथ, मार्ग
रहस्य मर्म, गूढ, खुबी
रक्षण बचाव, संरक्षण
राकट आडदांड, दणकट
राग क्रोध, संताप, रोष, त्वेष
रागीट कोपी, संतापी, कोपिष्ट, रागीष्ट, क्रोधिष्ट
राजा नृप, नरेश, भूपाल, नृपती, राया, भूपती, भूप, पृथ्वीपती, प्रजापती, महिपती, अवनीपती
राणी राज्ञी, राजपत्नी, सम्राज्ञी
रात्र निशा, रजनी, यामिनी, शर्वरी, विभावरी, क्षपा, तमी
राबता वर्दळ, ये-जा, येणे-जाणे
राक्षस दानव, असुर, दैत्य
रात्रंदिवस सतत, अहोरात्र, अष्टर्निशी
रिता रिकामा, रिक्त, मोकळा
रुकार होकार, संमती, मान्यता
रुणझुण मंजूळ आवाज
रूढ चालू, प्रचलित
रोग व्याधी, विकार, पीडा, उपद्रव
रोमांच काटा, शहारे
रंक गरीब, दीन
रंभा अप्सरा, देवांगना
लकडा नेट
लकब पद्धती, धाटणी, ढब, शैली
लगत समीप, जवळ, निकट, सन्निध
लज्जत गोडी, माधुरी
लढाई युद्ध, समर, रण, संगर, संग्राम, द्वंद्व
लता वेल, वल्लरी, लतिका, कुंज, वल्ली
लय क्षय, नाश, निःपात
लवण मीठ, क्षार, खार
लायक पात्र, योग्य, व्यक्तिरेखा
लावण्यवती रूपवती, देखणी, सुंदर, सरूप, रूपवान, सुरूप, सुस्वरूप
लेखणी कलम
लोभ हाव, हव्यास
वचन ठराव, कबुली, करार
वध हत्या, खून
वाडा प्रासाद
वाढ उत्कर्ष, भरभराट, प्रगती, उन्नती, वृद्धी
वाहवा स्तुती, प्रशंसा, वाखाणणी
विद्यार्थी छात्र, शिष्य
विरळ पातळ, विरविरीत
वारा वायू, पवन
विलंब उशीर
विवेचन ऊहापोह
विस्तव निखारा
विसंगत असंबद्ध
वेगळे अलिप्त, निराळे, तटस्थ
व्यवस्था तरतूद
व्यसन चाळा, अयोग्यनाद
वृत्तांत मजकूर, हकिकत, बातमी
वृद्धत्व वार्धक्य, म्हातारपण, जर्जर, वयस्क
शत्रू वैरी
शुद्ध स्वच्छ, शुभ्र
शिक्षक अध्यापक, गुरूजी, गुरू
शेत मळा, आगर
शोध संशोधन

This article has been first posted on and last updated on by