समानार्थी शब्दांची यादी – ‘ट’ पासून ‘ढ’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द समानार्थी शब्द
टवाळकी थट्टा, उपहास, कुचेष्टा, नक्कल, टिंगल, छेड, मस्करी, खोड्या, उनाडक्या
टाहो हंबरडा, आक्रोश
टाळा कुलूप
टाळाटाळ चालढकल, टंगळमंगळ, टोलवाटोलवी, चुकवाचुकव
टिका आलोचना, भाष्य, टिप्पणी
टिप्पण टीप, खुलासा, टिपण
टुमदार रम्य, डौलदार, मोहक, सुरेख, छानदार
टोकरा नाव, होडी
टोणगा रेडा, हेला, खुळगा
टोपण झाकण, आवरण
टोलेजंग भव्य, अजस्त्र, विशाल, प्रचंड
टोळी झुंड, जमाव, समूह, समुदाय
टंचाई कमतरता
ठक फसवा, भोंदू, धूर्त, दांभिक
ठसा खूण, शिक्का
ठळक स्पष्ट, जाड, ,मोठ्ठा, दृढ, लक्षणीय, निर्विवाद
ठाम पक्का, स्थिर, दृढ, कायम, अविचल, निश्चित
ठेका ताल, मक्ता
ठेव संचय, निधी
ठेंगणा बुटका, खुजा
डाकू चोर, दरोडेखोर
डावपेच कट, डाव
डोके माथा, शीर्ष, शिर, मस्तक
डौलदार सुबक, घाटदार, सुंदर
डंका नौबत, नगारा
डंगर म्हातारा, वृद्ध
डिंक खळ
मठ्ठ, मूर्ख, अक्षरशत्रू, दगडोबा, अक्कलशून्य, निर्बुद्ध
ढिला शिथिल, भोंगळ, सुस्त, खिळखिळा
ढीग खच, भर, थर, रास, थप्पी
ढेकूण मत्कुण
ढोर गुरे, जनावरे
ढोंग सोंग, पाखंड, बतावणी

This article has been first posted on and last updated on by