समानार्थी शब्दांची यादी – ‘ष’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द समानार्थी शब्द
सकाळ प्रभात
समारोप सांगता, शेवट, इतिश्री
सीता जानकी, मैथिली, भूमिकन्या, वैदेही
सुवत्ता समृद्धी, भरभराट, संपन्नता
सुवास सुगंध
सौभाग्यवती सुवासिनी, सवाष्ण, सधवा, अविधवा, अहेव
स्थावर अजंगम, अचल
स्थूल लठ्ठ, बोजड, गडशीळ
स्वर्ग इंद्रलोक, त्रिविष्टप
स्वाभाविक नैसर्गिक, सहज, प्राकृतिक, मूळ
स्वामी धनी, मालक, अधिपती
स्वैर स्वच्छंदी, बेलगाम
सोने सुवर्ण, कांचन, हेम
संकट अरिष्ट
संपत्ती श्रीमंती, ऐश्वर्य, संपदा
संबंध अन्वय
हट्टी हेकेखोर, हेकट
हलकट बदफैली, चैनबाज
हात कर
होडी नौका, नाव, तर
हुंदका उमाळा, गहिवर
क्षणिक अशाश्वत, क्षणभंगुर
क्षय ऱ्हास

This article has been first posted on and last updated on by