समानार्थी शब्दांची यादी – ‘च’ पासून ‘झ’ पर्यंत

पुढील तक्त्यामध्ये मूळ शब्द आणि त्याचे एक किंवा अनेक समानार्थी शब्द दिले आहेत.

मूळ शब्द समानार्थी शब्द
चकचकीत साफसूफ, लख्ख
चक्रम तऱ्हेवाईक, विलक्षण
चर्चा विचारविनिमय, ऊहापोह, वादविवाद, विचारविमर्श, विचारमंथन
चपखल तंतोतंत, नीट, बरोबर, नेमका, साजेसा
चमक उसण, एलकी
चमत्कार करामत, नवल
चमत्कारिक विलक्षण, अद्भुत, गजब, आश्चर्यकारक
चर जंगम, चलनक्षम
चरण पाय, पाद
चलाख चाणाक्ष, धूर्त, चुणचुणीत, तरतरीत, चपळ
चष्मा उपनेत्र
चहाडी चुगली, लावालावी, कळ, कुटाळी
चालढकल दिरंगाई, टंगळमंगळ, टाळाटाळ, हयगय
चावी किल्ली
चिकट चेंगट, कंजूष
चिकित्सा रोगपरीक्षा, रोगनिदान, वितर्क, सुक्ष्मशोध
चित्तवेधक आकर्षक, मनोवेधक, हृदयंगम
चित्र प्रतिमा, छबी
चिरंजीव चिरायू, दीर्घायुषी, अमर, शाश्वत, चिरंजीवी
चूर्ण भुकटी, पावडर, चुरा, पूड, भुगा, बुकणी, फक्की
चेपणे दाबणे
चेहरा मुद्रा, रूप, चर्या, तोंडवळा
चैतन्य चेतना, जीवनशक्ती
चोर डाकू, चोरटा, भामटा, ठग, दरोडेखोर, लुच्चा, शर्विलक, उचल्या, खिसेकापू
चंगळ रेलचेल, लयलूट, समृद्धी, चैन, मजा
चंद्र सोम, शशी, चांदोबा, रजनीकांत, सुधाकर, विभाकर, शशांक, राकेश, निशानाथ, कलाधर, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, मयंक
चंद्रिका ज्योत्स्ना, चांदणे, कौमुदी, चंद्रप्रकाश
चांगला उत्कृष्ट, निवडक, उत्तम, भला, योग्य, छान, सुंदर, सुरेख, उत्कृष्ट, झक्क, मस्त, चोख
चिंतन मनन, ध्यान, ध्यास
चिंता काळजी, घोर, हुरहूर, विवंचना
चेंडू कंदुक
चौकशी विचारपूस
छत्रपती चक्रवर्ती, सम्राट, राजाधिराज
छळ जाच, छळणूक
छाप ठसा, शिक्का, मुद्रा
छिद्र बोळ, छेद, वेज, भोक
छीथू हेटाळणी, फजिती
जग विश्व, भुवन, दुनिया, पृथ्वी, जगत, भूलोक
जठर पोट, उदर
जड स्थूल
जन्म जनन, प्रसव, उत्पत्ती
जल पाणी, उदक, तोय, अंबू, नीर, जीवन, आप
जबर जंगी
जमीन भू, धरती, भूमी, भुई, धरणी, धरित्री, शेत
जागृत सावध, सजग, जागा, जागरूक, सावधान, तत्पर, दक्ष, सचेत, खबरदार
जागा स्थळ, स्थान, ठिकाण
जाज्वल्य प्रखर, तेजस्वी, तेजःपुंज, लखलखीत, चमकदार
जाड्य जडत्व, मंदपणा, स्थूलता
जात वर्ण, वर्ग
जादू गारूड, इंद्रजाल, मंत्रटोणा, गुप्तविद्या
जाहिर प्रकट, प्रसिद्ध, सर्वश्रुत
जिराईत कोरडवाहू, बंजर
जीर्ण फाटलेला, फुटका
जीभ जिव्हा, रसना, रसनेन्द्रीय
जीवन आयुष्य, जीवित, जगणे
जुजबी तात्पुरते, अस्थायी, हंगामी
जुना जीर्ण, प्राचीन, पुरातन, पडीक, जून, पुराणा
जेवण अन्न, भोजन, आहार
जोडपे दंपती, युगल, युग्म, दुक्कल
जंगल वन, रान, कानन
जंतू कृमी, जंत, जीव, किडा, कीटक
ज्योतिष भविष्य, जातक, कुंडली
ज्वाला ज्योत, अग्नी, शिखा
झगमग झकपक, चमक, चकाकी
झटपट लवकर, पटपट, झपझप, जलद
झडती तपासणी, शोध, धुंडाळा
झपाटा आवेश, जोर, तडाखा
झरा निर्झर
झळ धग
झाड वृक्ष, तरू, विटप, द्रुम, वनस्पती
झीज क्षय, नाश, तूट
झुला झोपाळा, झोका, हिंदोळा, पाळणा
झोपडी कुटी, खोपट
झंजावात वावटळ, तुफान, वादळ, चक्रवात, सोसाटा
झुंजार लढवय्या, रणशूर, रणगाजी
झेंडा निशाण, ध्वज, पताका

This article has been first posted on and last updated on by