विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास

कर्मधारय समासाचे प्रकार

ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील दुसरे पद म्हणजे उत्तरपद हे विशेषण असते, त्या समासाला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास

'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' म्हणजे काय?

ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील दुसरे पद म्हणजे उत्तरपद हे विशेषण असते, त्या समासाला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

समासाची काही वैशिष्ट्ये

विशेषण - उत्तरपद कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये

  • विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास हा कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील उत्तरपद हे नेहमी विशेषण असते.
  • या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
  • या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो.
समासाची काही उदाहरणे

विशेषण - उत्तरपद कर्मधारय समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • घननील = निळा असा घन

'घननील' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'निळा असा घन' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद ‘नील’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील पहिले पद ‘घन’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे त्याला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • पुरूषोत्तम = उत्तम असा पुरूष

'पुरूषोत्तम' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'उत्तम असा पुरूष' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद ‘उत्तम’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील पहिले पद ‘पुरूष’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे त्याला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • रामदयाळ = दयाळू असा राम

'रामदयाळ' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'दयाळू असा राम' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद ‘दयाळ’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील पहिले पद ‘राम’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे त्याला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • सर्वोत्तम = सर्वांमधील उत्तम

'सर्वोत्तम' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सर्वांमधील उत्तम' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद ‘उत्तम’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील पहिले पद ‘सर्व’ हे एक सर्वनाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे त्याला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५
  • विषयांतर = अन्य विषय

'विषयांतर' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'अन्य विषय' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद ‘अंतर’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील पहिले पद ‘विषय’ हे नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे त्याला 'विशेषण - उत्तरपद कर्मधारय समास' असे म्हणतात.

विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास विशेषण - उभयपद कर्मधारय समास

This educational article was first posted on and last updated on by