पूर्णविराम


विरामचिन्हांचे प्रकार



पूर्णविराम

( . ) हे पूर्णविरामाचे चिन्ह आहे.

पूर्णविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.

मराठी वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरले जाते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

आज शाळा सात वाजता आहे.

उदाहरण क्र. २

मी उद्या गावाला जाणार आहे.

उदाहरण क्र. ३

तो रोज व्यायाम करत नाही.

उदाहरण क्र. ४

ताईने वर पाहिले.

उदाहरण क्र. ५

आमच्या गावी आंब्याची खूप झाडं आहेत.

वरील सर्व उदाहरणांमध्ये वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शविण्यासाठी पूर्णविराम ( . ) हे चिन्ह वापरलेले आहे.

This article has been first posted on and last updated on by