प्रश्नचिन्ह
( ? ) हे प्रश्नचिन्ह आहे.
प्रश्नचिन्ह हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी व्याकरणातील एखादे वाक्य प्रश्नार्थी आहे हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो.
ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असते, त्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
विजय कुठे गेला आहे?
वरील वाक्यामध्ये कुठे हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ( ? ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
आपण यावर्षी गावाला कधी जाणार आहोत?
वरील वाक्यामध्ये कधी हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ( ? ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
त्याने तुला का मारलं?
वरील वाक्यामध्ये का हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ( ? ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
काल रात्री तुमच्याकडे कोण आलं होतं?
वरील वाक्यामध्ये कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ( ? ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
तुम्ही फिरायला केव्हा जाणार आहात?
वरील वाक्यामध्ये केव्हा हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ( ? ) वापरले आहे.