अपूर्णविराम
( : ) हे अपूर्णविरामाचे चिन्ह आहे.
अपूर्णविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविरामाचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
दहापेक्षा लहान विषम संख्या पुढीलप्रमाणे आहेत : १, ३, ५, ७, ९
वरील वाक्यामध्ये दहापेक्षा लहान विषम संख्यांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
सहामाही परीक्षेत आठवीतील पुढील क्रमांकाचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत : ५६, ४५, १२०, ६०, ९५
वरील वाक्यामध्ये आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
खडकांचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : अग्निजन्य, स्तरित, रूपांतरित
वरील वाक्यामध्ये खडकांच्या प्रकारांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
माणसाच्या मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे आहेत : अन्न, वस्त्र, निवारा
वरील वाक्यामध्ये माणसाच्या मूलभूत गरजांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तीन देश पुढीलप्रमाणे आहेत : रशिया, कॅनडा, अमेरिका
वरील वाक्यामध्ये क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठ्या तीन देशांचा तपशील दाखविण्यासाठी अपूर्णविरामाचे चिन्ह ( : ) वापरले आहे.