उत्साहाला उधाण येणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'उत्साहाला उधाण येणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'उत्साहाला उधाण येणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'उत्साहाला उधाण येणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • खूप आनंद होणे
  • उत्साह वाढणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • भारताने पाकिस्ताविरुद्ध सामना जिंकल्यावर भारतीयांच्या उत्साहाला उधाण आले.

वरील वाक्यात असे दिसते की भारताने पाकिस्ताविरुद्ध सामना जिंकल्यावर भारतीयांना खूप आनंद झाला.

हे दर्शविण्यासाठी 'खूप आनंद होणे' याऐवजी 'उत्साहाला उधाण येणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • शाळेच्या सहलीची बातमी ऐकताच मुलांच्या उत्साहाला उधाण आले.

वरील वाक्यात असे दिसते की शाळेच्या सहलीची बातमी ऐकताच मुलांचा उत्साह वाढला.

हे दर्शविण्यासाठी 'उत्साह वाढणे' याऐवजी 'उत्साहाला उधाण येणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'उत्साहाला उधाण येणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • गौरी -गणपती आगमनाची तयारी सुरु होताच सर्वांच्या उत्साहाला उधाण आले.
  • स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यावर स्वराच्या उत्साहाला उधाण आले.
  • नवीन प्रकल्पाची घोषणा होताच कर्मचाऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले.
उत्कंठा वाढणे एकमत होणे

This educational article was first posted on and last updated on by