मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.
‘सुरूंग लावणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्यप्रचार आहे.
वाक्यप्रचाराचा अर्थ
- एखादा बेत उधळून लावणे
- एखाद्या कार्यात अडथळा आणणे
वाक्यप्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
नवीन आलेल्या प्रशासनाने कल्याणकारी योजनांना सुरूंग लावला.
वरील वाक्यात असे दिसते की नवीन आलेल्या प्रशासनाने कल्याणकारी योजना राबविण्याचा बेत उधळून लावला.
हे दर्शविण्यासाठी बेत उधळून लावणे या ऐवजी सुरूंग लावणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
चौपाटीवर कचरा करून पालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांनी सुरूंग लावला.
वरील वाक्यात असे दिसते की चौपाटीवर कचरा करून पालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी अडथळा आणला.
हे दर्शविण्यासाठी अडथळा आणणे या ऐवजी सुरूंग लावणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
मुघलांच्या साम्राज्यविस्ताराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरूंग लावला.
वरील वाक्यात असे दिसते की मुघलांचा साम्राज्यविस्ताराचा बेत छत्रपती शिवाजी महाराजांनी उधळून लावला.
हे दर्शविण्यासाठी बेत उधळून लावणे या ऐवजी सुरूंग लावणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
मधू नापास झाल्याने आईच्या स्वप्नांना सुरूंग लागला.
वरील वाक्यात असे दिसते की मधू नापास झाल्याने आईने त्याच्यासाठी बघितलेले स्वप्न उधळून गेले.
हे दर्शविण्यासाठी उधळून जाणे या ऐवजी सुरूंग लागणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.