मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘सोनेरी अक्षरात कोरणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
सदैव संस्मरणीय असणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात सदैव संस्मरणीय आहे.
हे दर्शविण्यासाठी ‘सदैव संस्मरणीय असणे’ याऐवजी ‘सोनेरी अक्षरात कोरणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
भारतरत्न लतादीदींचे नाव संगीतक्षेत्रात सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की भारतरत्न लतादीदींचे नाव संगीतक्षेत्रात सदैव संस्मरणीय आहे.
हे दर्शविण्यासाठी ‘सदैव संस्मरणीय असणे’ याऐवजी ‘सोनेरी अक्षरात कोरणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘सोनेरी अक्षरात कोरणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाचे नाव इतिहासात सोनेरी अक्षरात कोरले जाते.
-
क्रीडा जगतात नीरज चोप्राचे नाव सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे.
-
‘माऊंट एव्हरेस्ट’ हे नाव प्रत्येक पर्वतप्रेमीच्याच नाही तर अगदी सामान्य माणसाच्याही मनावर सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे.