मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘शाश्वती नसणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- भरवसा नसणे
- खात्री नसणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
अरूणिमा एव्हरेस्ट शिखर सर करेल याची कुणालाही शाश्वती नव्हती.
वरील वाक्यात असे दिसते की अरूणिमा एव्हरेस्ट शिखर सर करेल याचा कुणालाही भरवसा नव्हता.
हे दर्शविण्यासाठी ‘भरवसा नसणे’ या ऐवजी ‘शाश्वती नसणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
समाज शिक्षित झाला म्हणजे प्रगल्भ होईलच याची शाश्वती नाही.
वरील वाक्यात असे दिसते की समाज शिक्षित झाला म्हणजे प्रगल्भ होईलच याची खात्री नसते.
हे दर्शविण्यासाठी ‘खात्री नसणे’ या ऐवजी ‘शाश्वती नसणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
माझा वर्गात पहिला क्रमांक येईल याची मला शाश्वती नव्हती.
वरील वाक्यात असे दिसते की माझा वर्गात पहिला क्रमांक येईल याचा मला भरवसा नव्हता.
हे दर्शविण्यासाठी ‘भरवसा नसणे’ या ऐवजी ‘शाश्वती नसणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘शाश्वती नसणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
विवेक मल्लखांब शिकेल याची कुणालाही शाश्वती नव्हती.
-
सीमेवर गेलेला जवान परतेल की नाही याची शाश्वती नसते.