वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'सर्वस्व पणाला लावणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'सर्वस्व पणाला लावणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
- जे जे शक्य आहे, ते ते करणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- आमची शाळा नावारूपाला येण्यासाठी सर्वानीच सर्वस्व पणाला लावले.
वरील वाक्यात असे दिसते की आमची शाळा नावारूपाला येण्यासाठी सर्वानीच जे जे शक्य आहे, ते ते केले.
हे दर्शविण्यासाठी 'जे जे शक्य आहे, ते ते करणे' याऐवजी 'सर्वस्व पणाला लावणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- दहशतवाद्यांचा खात्मा करताना आपल्या सैनिकांनी सर्वस्व पणाला लावले.
वरील वाक्यात असे दिसते की दहशतवाद्यांचा खात्मा करताना आपल्या सैनिकांनी सर्व शक्य मार्गांचा अवलंब केला.
हे दर्शविण्यासाठी 'सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे' याऐवजी 'सर्वस्व पणाला लावणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'सर्वस्व पणाला लावणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी कोविड योद्धे सर्वस्व पणाला लावत आहेत.
- दहावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी हर्षदाने सर्वस्व पणाला लावले.