मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘मन बसणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
फार आवडणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
सरिताला दुकानदाराने खूप साड्या दाखवल्या; पण हिरव्या साडीवरच तिचे मन बसले.
वरील वाक्यात असे दिसते की सरिताला हिरवी साडी फार आवडली.
हे दर्शविण्यासाठी फार आवडणे या ऐवजी मन बसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
भरत चित्रपट जरी करत असला तरी नाटकावर त्याचे मन बसले आहे.
वरील वाक्यात असे दिसते की भरतला नाटक फार आवडते.
हे दर्शविण्यासाठी फार आवडणे या ऐवजी मन बसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले जिंकले; पण कोंढाणा किल्ल्यावर त्यांचे मन बसले होते.
वरील वाक्यात असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला फार आवडत असे.
हे दर्शविण्यासाठी फार आवडणे या ऐवजी मन बसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
सुमितने खूप फोन बघितले; पण आयफोनवर त्याचे मन बसले होते.
वरील वाक्यात असे दिसते की सुमितला आयफोन फार आवडत होता.
हे दर्शविण्यासाठी फार आवडणे या ऐवजी मन बसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.