मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘कवेत घेणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- मिठीत घेणे
- मिठी मारणे
- जवळ घेणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
परगावाहून घरी आलेल्या आपल्या मुलाला वडिलांनी प्रेमाने कवेत घेतले.
वरील वाक्यात असे दिसते की परगावाहून घरी आलेल्या आपल्या मुलाला वडिलांनी प्रेमाने मिठीत घेतले.
हे दर्शविण्यासाठी मिठीत घेणे या ऐवजी कवेत घेणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
परिक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे आईने स्वराला प्रेमाने कवेत घेतले.
वरील वाक्यात असे दिसते की परिक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे आईने स्वराला प्रेमाने जवळ घेतले.
हे दर्शविण्यासाठी जवळ घेणे या ऐवजी कवेत घेणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
अल्लाउद्दीन खिलजीपासून आपले रक्षण करण्यासाठी राणी पद्मावतीने अग्नीला कवेत घेतले.
वरील वाक्यात असे दिसते की अल्लाउद्दीन खिलजीपासून आपले रक्षण करण्यासाठी राणी पद्मावतीने अग्नीला मिठी मारली.
हे दर्शविण्यासाठी मिठी मारणे या ऐवजी कवेत घेणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘कवेत घेणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
सुजय कंपनीत लागलेल्या आगीने तिच्या शेजारी असलेल्या कंपनीलाही कवेत घेतले.
-
दारूचे व्यसन हे हळूहळू मृत्यूला कवेत घेते.
-
पल्लवीमध्ये असलेल्या जिद्दीने यशालाही कवेत घेतले.