कान देऊन ऐकणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'कान देऊन ऐकणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'कान देऊन ऐकणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'कान देऊन ऐकणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • लक्षपूर्वक ऐकणे
  • काळजीपूर्वक ऐकणे.
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांनी कान देऊन ऐकावे.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.

हे दर्शविण्यासाठी ‘लक्षपूर्वक ऐकणे’ याऐवजी ‘कान देऊन ऐकणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • डॉक्टरांचे सल्ले रुग्णाने कान देऊन ऐकावे.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की डॉक्टरांचे सल्ले रुग्णाने काळजीपूर्वक ऐकावेत.

हे दर्शविण्यासाठी ‘काळजीपूर्वक ऐकणे’ याऐवजी ‘कान देऊन ऐकणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'कान देऊन ऐकणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • आई सांगत असलेली गोष्ट अथर्व कान देऊन ऐकत होता.
  • रामकथा श्रोत्यांनी कान देऊन ऐकली.
  • गुंतवणूक कोठे व कशी करावी यावरील भाषण सर्वांनी कान देऊन ऐकले.
कागाळी करणे काबाडकष्ट करणे

This educational article was first posted on and last updated on by