मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“काबाडकष्ट करणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- खूप परिश्रम घेणे
- जीवतोड मेहनत करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
आमच्या बाबांनी आम्हा मुलांना शिकवण्यासाठी काबाडकष्ट केले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की बाबांनी मुलांना शिकवण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
हे दर्शविण्यासाठी खूप परिश्रम केले ऐवजी काबाडकष्ट केले असा वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
परीक्षेत पहिला क्रमांक येण्यासाठी विवेकने काबाडकष्ट केले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की परीक्षेत पहिला क्रमांक येण्यासाठी विवेकने खूप परिश्रम घेतले.
हे दर्शविण्यासाठी खूप परिश्रम केले ऐवजी काबाडकष्ट केले असा वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी सुमीतने काबाडकष्ट केले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी सुमीतने खूप परिश्रम घेतले.
हे दर्शविण्यासाठी खूप परिश्रम केले ऐवजी काबाडकष्ट केले असा वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.