मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘झोकून देणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- पूर्णपणे सहभागी होणे
- एखाद्या कार्यात समरस होणे
- अडचणीवर मात करत पूर्णपणे गुंतून जाणे
- एखाद्या कार्यात मनापासून सहभाग घेणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजयने स्वतःला झोकून दिले.
वरील वाक्यात असे दिसते की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजयने अडचणीवर मात करत स्वतःला पूर्णपणे गुंतून घेतले.
हे दर्शविण्यासाठी झोकून देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सिंधूताईंनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले.
वरील वाक्यात असे दिसते की सिंधूताई समाजकार्यात पूर्णपणे सहभागी झाल्या.
हे दर्शविण्यासाठी झोकून देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
विनायकने अभ्यासात स्वतःला झोकून दिले.
वरील वाक्यात असे दिसते की विनायक अभ्यासात समरस झाला.
हे दर्शविण्यासाठी झोकून देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘झोकून देणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
कादंबरी पूर्ण करण्यात सतीशने स्वतःला झोकून दिले.
-
प्रतिभाताईंनी राष्ट्रीय पातळीवर संघटनकार्यात स्वतःला झोकून दिले.
-
गोसंवर्धनाच्या कार्यात रत्नाकररावांनी स्वतःला झोकून दिले.