मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘जीव भांड्यात पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
काळजी नाहीशी होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
आरूषीची कोरोना चाचणी नकारात्मक आली हे समजताच आईचा जीव भांड्यात पडला.
वरील वाक्यात असे दिसते की आरूषीची कोरोना चाचणी नकारात्मक आली हे समजताच आईची काळजी नाहीशी झाली.
हे दर्शविण्यासाठी ‘काळजी नाहीशी होणे’ या ऐवजी ‘जीव भांड्यात पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
रागाच्या भरात घरातून निघून गेलेला चिन्मय मामाकडे आहे हे समजताच त्याच्या आई-बाबांचा जीव भांड्यात पडला.
वरील वाक्यात असे दिसते की रागाच्या भरात घरातून निघून गेलेला चिन्मय मामाकडे आहे हे समजताच त्याच्या आई-बाबांची काळजी नाहीशी झाली.
हे दर्शविण्यासाठी ‘काळजी नाहीशी होणे’ या ऐवजी ‘जीव भांड्यात पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेव्हा वन अधिकाऱ्यांनी जेरबंद केले, तेव्हा गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
वरील वाक्यात असे दिसते की दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेव्हा वन अधिकाऱ्यांनी जेरबंद केले, तेव्हा गावकऱ्यांची काळजी नाहीशी झाली.
हे दर्शविण्यासाठी ‘काळजी नाहीशी होणे’ या ऐवजी ‘जीव भांड्यात पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘जीव भांड्यात पडणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
मनिषा माहेरी सुखरूप पोचली हे कळताच सुनीलचा जीव भांड्यात पडला.
-
बोगद्यात अडकलेले श्रमिक सतरा दिवसांनी जेव्हा बोगद्याबाहेर पडले, तेव्हा समस्त देशवासीयांचा जीव भांड्यात पडला.
-
पाच दिवसांपूर्वी अपहरण झालेली चिमुकली जेव्हा घरी सुखरूप परत आली, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.