वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'होळी करणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'होळी करणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- पूर्ण नाश करणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी आळसाची होळी केली पाहिजे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी आळसाचा पूर्ण नाश केला पाहिजे.
हे दर्शविण्यासाठी 'पूर्ण नाश करणे' याऐवजी 'होळी करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- भारतीयांनी राष्ट्रहितविरोधी विचारांची होळी केली पाहिजे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की भारतीयांनी राष्ट्रहितविरोधी विचारांचा पूर्ण नाश केला पाहिजे.
हे दर्शविण्यासाठी 'पूर्ण नाश करणे' याऐवजी 'होळी करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'होळी करणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- प्रत्येकाने आपल्यातल्या वाईट विचारांची होळी करावी.
- दादासाहेबांनी अनाथ लेकरांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या शरीराची आणि संसाराची होळी केली.