मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘गवगवा होणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- सगळीकडे बोलबाला होणे
- बोभाटा होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
साईकृपा इमारतीत बिबट्या शिरल्याचा गवगवा झाला.
वरील वाक्यात असे दिसते की साईकृपा इमारतीत बिबट्या शिरल्याचा सगळीकडे बोलबाला झाला.
हे दर्शविण्यासाठी सगळीकडे बोलबाला होणे या ऐवजी गवगवा होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
गावात नवीन उपहारगृह सुरू झाल्याचा सर्व गावात गवगवा झाला.
वरील वाक्यात असे दिसते की गावात नवीन उपहारगृह सुरू झाल्याचा सगळीकडे बोलबाला झाला.
हे दर्शविण्यासाठी सगळीकडे बोलबाला होणे या ऐवजी गवगवा होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा सर्व जगभरात गवगवा झाला.
वरील वाक्यात असे दिसते की युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा सर्व जगभरात बोभाटा झाला.
हे दर्शविण्यासाठी बोभाटा होणे या ऐवजी गवगवा होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
१२५ वर्षांचे योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याचा संपूर्ण देशात गवगवा झाला.
वरील वाक्यात असे दिसते की १२५ वर्षांचे योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याचा सगळीकडे बोलबाला झाला.
हे दर्शविण्यासाठी सगळीकडे बोलबाला होणे या ऐवजी गवगवा होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.