मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘डोळे भरून पाहणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- प्रेमाने अनुभवणे
- ममत्वाने कौतुकाने बघणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
समर्थ शौर्य पुरस्कार स्वीकारत असताना त्याची आई त्याला डोळे भरून पाहत होती.
वरील वाक्यात असे दिसते की समर्थ शौर्य पुरस्कार स्वीकारत असताना त्याची आई त्याच्याकडे ममत्वाने कौतुकाने बघत होती.
हे दर्शविण्यासाठी डोळे भरून पाहणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदा डोळे भरून पाहत होती.
वरील वाक्यात असे दिसते की श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदा प्रेमाने अनुभवत होती.
हे दर्शविण्यासाठी डोळे भरून पाहणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
छत्रपती शिवाजी महाराजांची विजयी घौडदौड डोळे भरून पाहावी असे जिजाऊंना वाटे.
वरील वाक्यात असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांची विजयी घौडदौड ममत्वाने कौतुकाने बघावी असे जिजाऊंना वाटे.
हे दर्शविण्यासाठी डोळे भरून पाहणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘डोळे भरून पाहणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
परदेशात जाणाऱ्या आपल्या लेकीकडे सुरेशराव डोळे भरून पाहत होते.
-
विशाल जनसमुदायासमोर केतकी गात असताना तिचे गुरू तिच्याकडे डोळे भरून पाहत होते.