धारातीर्थी पडणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'धारातीर्थी पडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'धारातीर्थी पडणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'धारातीर्थी पडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • रणांगणावर वीरमरण येणे
  • रणांगणावर मृत्यू येणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.

वरील वाक्यात असे दिसते की कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांना रणांगणावर वीरमरण आले.

हे दर्शविण्यासाठी 'रणांगणावर वीरमरण येणे' याऐवजी 'धारातीर्थी पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • भारतीय स्वातंत्र्ययुद्धात अनेक योद्धे धारातीर्थी पडले.

वरील वाक्यात असे दिसते की भारतीय स्वातंत्र्ययुद्धात अनेक योद्ध्यांना रणांगणावर वीरमरण आले.

हे दर्शविण्यासाठी 'रणांगणावर वीरमरण येणे' याऐवजी 'धारातीर्थी पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'धारातीर्थी पडणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मावळे धारातीर्थी पडले.
  • पानिपतच्या युद्धात मराठे अब्दालीसारख्या बलाढ्य परकीय आक्रमकांशी लढताना धारातीर्थी पडले.
धडकी भरणे धीर न सोडणे

This educational article was first posted on and last updated on by