मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘चंग बांधणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- निश्चय करणे
- निर्धार करणे
- प्रतिज्ञा करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायचा, असा मनिषाने चंग बांधला.
वरील वाक्यात असे दिसते की परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायचा, असा मनिषाने निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी ‘निश्चय करणे’ या ऐवजी ‘चंग बांधणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
रविवारी रायगडावर जाणारच, असा विवेकने चंग बांधला.
वरील वाक्यात असे दिसते की रविवारी रायगडावर जाणारच, असा विवेकने निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी ‘निश्चय करणे’ या ऐवजी ‘चंग बांधणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
विधानसभा निवडणूकीत प्रतापरावांना निवडून आणणारच, असा कार्यकर्त्यांनी चंग बांधला.
वरील वाक्यात असे दिसते की विधानसभा निवडणूकीत प्रतापरावांना निवडून आणणारच, असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला.
हे दर्शविण्यासाठी ‘निर्धार करणे’ या ऐवजी ‘चंग बांधणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘चंग बांधणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
अतिक्रमणाचा विळखा सोडवण्याचा आयुक्तांनी चंग बांधला.
-
काहीही करून सिंहगड किल्ला जिंकायचा, असा तानाजी मालुसरेंनी चंग बांधला.