बुचकळ्यात पडणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'बुचकळ्यात पडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'बुचकळ्यात पडणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'बुचकळ्यात पडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • गोंधळून जाणे
  • पेचात पडणे
  • समजेनासे होणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • सुशीलरावांनी कोणत्या पक्षात जायचे हे नक्की न केल्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले.

वरील वाक्यात असे दिसते की सुशीलरावांनी कोणत्या पक्षात जायचे हे नक्की न केल्यामुळे कार्यकर्ते गोंधळून गेले किंवा त्यांना काय करावे हे समजेनासे झाले.

हे दर्शविण्यासाठी 'गोंधळून जाणे' याऐवजी 'बुचकळ्यात पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • काल अचानक फेसबुक बंद पडल्यामुळे फेसबुक वापरकर्ते बुचकळ्यात पडले.

वरील वाक्यात असे दिसते की काल अचानक फेसबुक बंद पडल्यामुळे फेसबुक वापरकर्ते गोंधळून गेले.

हे दर्शविण्यासाठी 'गोंधळून जाणे' याऐवजी 'बुचकळ्यात पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'बुचकळ्यात पडणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • इमारतीत अचानक पोलीस आल्यामुळे सर्व बुचकळ्यात पडले.
  • सुनिताने लिहिलेला लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने मासिकात प्रसिद्ध झाल्याने सुनिता बुचकळ्यात पडली.
पोरके होणे भान नसणे

This educational article was first posted on and last updated on by