वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'भुरळ घालणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'भुरळ घालणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- भूल घालणे
- मोहवून टाकणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- उषाताईंच्या गाण्याने उपस्थित श्रोत्यांच्या मनाला भुरळ घातली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की उषाताईंच्या गाण्याने उपस्थित श्रोत्यांच्या मनाला मोहवून टाकले.
हे दर्शविण्यासाठी ‘मोहवून टाकणे’ याऐवजी ‘भुरळ घालणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- काश्मीरच्या सुंदर निसर्गाने पर्यटकांना भुरळ घातली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की काश्मीरच्या सुंदर निसर्गाने पर्यटकांना मोहवून टाकले.
हे दर्शविण्यासाठी ‘मोहवून टाकणे’ याऐवजी ‘भुरळ घालणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'भुरळ घालणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- मधुबालाच्या सुंदर हास्याने सगळ्यांच्या मनाला भुरळ घातली.
- समुद्रकिनाऱ्याच्या रम्य दृश्याने माझ्या मनाला भुरळ घातली.
- छोट्या मुलाच्या निरागस बोलण्याने आजीच्या मनाला भुरळ घातली.
- विणकाराने घडवलेली सुुंदर माहेश्वरी साडी बघून दुकानात उपस्थित असलेल्या समस्त स्त्री वर्गाला भुरळ पडली.