मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘अपराध पोटात घेणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- क्षमा करणे
- माफ करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई त्यांचे अपराध पोटात घेते.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई त्यांना माफ करते किंवा क्षमा करते.
हे दर्शविण्यासाठी ‘माफ करणे’ याऐवजी ‘अपराध पोटात घेणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
श्रीकृष्णाने शिशुपालचे शंभर अपराध पोटात घेतले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की श्रीकृष्णाने शिशुपालचे शंभर वेळा क्षमा केली.
हे दर्शविण्यासाठी ‘क्षमा करणे’ याऐवजी ‘अपराध पोटात घेणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘अपराध पोटात घेणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
वामनरावांनी सोहमचे क्षमायोग्य नसलेले अपराध पोटात घेतले.
-
मनुष्य कितीही चुकला तरी भगवंत आपले अपराध पोटात घेतो.
-
विठू माऊली भक्तांचे अपराध पोटात घेते.