वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'अंगवळणी पडणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'अंगवळणी पडणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- सवय होणे
- नित्यक्रम होणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- सकाळी लवकर फिरायला जाणे आता अभयच्या अंगवळणी पडले आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सकाळी लवकर उठून फिरायला जाणे हा अभयचा नित्यक्रम झाला आहे.
हे दर्शविण्यासाठी 'नित्यक्रम होणे' या ऐवजी 'अंगवळणी पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- पटापट टायपिंग करणे विवेकच्या आता अंगवळणी पडले आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की पटापट टायपिंग करण्याची विवेकला आता सवय झाली आहे.
हे दर्शविण्यासाठी 'सवय होणे' या ऐवजी 'अंगवळणी पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
- खेळून आल्यावर लगेचच गृहपाठ करून घेणे हे मीनलच्या अंगवळणी पडले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की खेळून आल्यावर लगेचच गृहपाठ करून घेण्याचा मीनलचा नित्यक्रम झाला आहे.
हे दर्शविण्यासाठी 'नित्यक्रम होणे' या ऐवजी 'अंगवळणी पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'अंगवळणी पडणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- कोरोनामुळे मुखपट्टी (मास्क) लावणे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे.
- एकामागून एक किल्ले सर करणे राघवच्या अंगवळणी पडले आहे.