मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.
‘अंगाचा तिळपापड होणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्यप्रचार आहे.
वाक्यप्रचाराचा अर्थ
- खूप राग येणे
- खूप संताप येणे
वाक्यप्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
महत्वाची कागदपत्रे घरभर पसरलेली पाहून बाबांच्या अंगाचा तिळपापड झाला.
वरील वाक्यात असे दिसते की महत्वाची कागदपत्रे घरभर पसरलेली पाहून बाबांना खूप राग आला.
हे दर्शविण्यासाठी खूप राग येणे या ऐवजी अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
आपल्या पक्षाचा झालेला दारूण पराभव बघून पक्षप्रमुखांच्या अंगाचा तिळपापड झाला.
वरील वाक्यात असे दिसते की आपल्या पक्षाचा झालेला दारूण पराभव बघून पक्षप्रमुखांना खूप राग आला.
हे दर्शविण्यासाठी खूप राग येणे या ऐवजी अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
विवेकने घरात केलेला पसारा पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला.
वरील वाक्यात असे दिसते की विवेकने घरात केलेला पसारा पाहून आईला खूप राग आला.
हे दर्शविण्यासाठी खूप राग येणे या ऐवजी अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
विद्यार्थी वेळेवर वर्गात उपस्थित नाहीत हे पाहून शिक्षकांच्या अंगाचा तिळपापड झाला.
वरील वाक्यात असे दिसते की विद्यार्थी वेळेवर वर्गात उपस्थित नाहीत हे पाहून शिक्षकांना खूप राग आला.
हे दर्शविण्यासाठी खूप राग येणे या ऐवजी अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे.