वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'आस लागणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'आस लागणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- ओढ लागणे
- एखादी गोष्ट मिळण्याची किंवा घडण्याची तीव्र इच्छा वाटणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- सर्वांनाच श्री गणरायाच्या आगमनाची आस लागली आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सर्वांनाच श्री गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे.
हे दर्शविण्यासाठी ‘ओढ लागणे’ याऐवजी ‘आस लागणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- शेतकऱ्यांना पावसाची आस लागली आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की शेतकऱ्यांना पाऊस पडावा अशी तीव्र इच्छा आहे.
हे दर्शविण्यासाठी ‘एखादी गोष्ट घडण्याची तीव्र इच्छा असणे’ याऐवजी ‘आस लागणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'आस लागणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- आईला मुलगा घरी कधी येतो याची आस लागली होती.
- सुमित्रला बारावी परीक्षेच्या निकालाची आस लागली आहे.
- आजीलाआजीला नातवंडांना भेटण्याची आस लागली आहे.