मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
'आगमन होणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- एखाद्या ठिकाणी पोहोचणे किंवा येणे
- उपस्थित होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
आज एकता सांस्कृतिक मंडळात वाजतगाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की एकता सांस्कृतिक मंडळात वाजतगाजत गणपती बाप्पा पोहोचले.
हे दर्शविण्यासाठी पोहोचणे या ऐवजी आगमन होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात भारतात आगमन करतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात भारतात येतात.
हे दर्शविण्यासाठी येणे या ऐवजी आगमन करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
पावसाचे वेळेत आगमन होणे ही शेतकऱ्यांसाठी खूप सुखद गोष्ट आहे.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की पाऊस वेळेवर येणे ही शेतकऱ्यांसाठी खूप सुखद गोष्ट आहे.
हे दर्शविण्यासाठी येणे या ऐवजी आगमन होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'आगमन होणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
आज मोठ्या आनंदाने गौराईचं घरी आगमन झालं.
-
एखाद्या नव्या संधीचे आगमन होणे ही प्रगतीची सुरुवात ठरते.
-
अंतराळवीरांचे वेळेत पृथ्वीवर आगमन झाले.