केवल वाक्य
मराठी व्याकरणात ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते, त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात.
उद्देश्य म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद होय.
केवल वाक्याची काही वैशिष्ट्ये
- केवल वाक्यामधून कर्त्याने केलेली फक्त एकच मुख्य क्रिया व्यक्त होते.
- केवल वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते.
- केवल वाक्यामध्ये फक्त एकच विधान केलेले असते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
प्रत्येकाने कायदा पाळावा.
वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.
या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.
- वाक्यातील उद्देश्य – प्रत्येकाने
- वाक्यातील विधेय – पाळावा
त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
बाजीप्रभू देशपांडे लढता-लढता अमर झाले.
वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.
या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.
- वाक्यातील उद्देश्य – बाजीप्रभू देशपांडे
- वाक्यातील विधेय – झाले
त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
गोरक्ष आंबा खातो.
वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.
या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.
- वाक्यातील उद्देश्य – गोरक्ष
- वाक्यातील विधेय – खातो
त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ४
अनिताने पंखा पुसला.
वरील वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया आहे.
या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश्य आणि एकच विधेय आहे.
- वाक्यातील उद्देश्य – अनिताने
- वाक्यातील विधेय – पुसला
त्यामुळे हे वाक्य केवल वाक्य आहे, असे समजावे.