क्रमवाचक विशेषण म्हणजे काय?
ज्या संख्याविशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांच्या क्रमांकाचा बोध होतो, त्या संख्याविशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही क्रमवाचक विशेषणे –
पहिलादुसरातिसराचौथापाचवासहावासातवाआठवा
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
विवेकचा वर्गामध्ये दुसरा क्रमांक आला.
या वाक्यामध्ये विवेकच्या क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी दुसरा हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
धोनी आज पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे.
या वाक्यामध्ये धोनीच्या खेळातील क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी पाचव्या हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
चंद्रावर जाणारा नील आर्मस्ट्रॉंग हा जगातील पहिला मनुष्य होता.
या वाक्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंगच्या चंद्रावर जाण्याच्या क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी पहिला हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.