गणनावाचक विशेषण म्हणजे काय?

ज्या संख्याविशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची गणती किंवा मोजणी करता येते, त्या संख्याविशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात.

मराठी व्याकरणातील काही गणनावाचक विशेषणे –

एक
पाच
दहा
चाळीस
शंभर
पाचशे
दोनशे
पन्नास

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

त्या झाडाला पाच फुले आली आहेत.

या वाक्यामध्ये फुलांची गणना करण्यासाठी पाच हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २

वर्गात एकूण चाळीस विद्यार्थी आहेत.

या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांची गणना करण्यासाठी चाळीस हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३

कालच्या सामन्यामध्ये सचिनने शंभर धावा केल्या.

या वाक्यामध्ये धावांची गणना करण्यासाठी शंभर हे गणनावाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

This article has been first posted on and last updated on by