सार्वनामिक विशेषण

विशेषणाचे प्रकार

मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात.

'सार्वनामिक विशेषण' म्हणजे काय?

'सार्वनामिक विशेषण' म्हणजे काय?

मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात.

काही सार्वनामिक विशेषणे

मराठी व्याकरणातील काही सार्वनामिक विशेषणे -

माझा माझी माझे माझ्या
तुझा तुझी तुझे तुझ्या
त्याचा त्याची त्याचे त्याच्या
तिचा तिची तिचे तिच्या
वाक्यातील उपयोग

सार्वनामिक विशेषणाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • सगळं सामान माझ्या पिशवीत ठेवलं आहे.

या वाक्यामध्ये 'मी' या सर्वनामापासून बनलेले 'माझ्या' हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २
  • तिचे घर खूप सुंदर आहे.

या वाक्यामध्ये 'ती' या सर्वनामापासून बनलेले 'तिचे' हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३
  • त्याचा मुलगा सध्या दहाव्या इयत्तेत शिकत आहे.

या वाक्यामध्ये 'तो' या सर्वनामापासून बनलेले 'त्याचा' हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ४
  • आयकर विभागाने त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली आहे.

या वाक्यामध्ये 'ते' या सर्वनामापासून बनलेले 'त्यांची' हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.

अनिश्चित विशेषण क्रियापद

This educational article was first posted on and last updated on by