संबंधी सर्वनाम म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या एखाद्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील संबंधी सर्वनामे –
जोजीजेज्या
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
जे काम तुम्ही करता, ते आम्ही पण करू शकतो.
या वाक्यामध्ये "जे" हे संबंधी सर्वनाम वापरण्यात आले असून त्याचा उपयोग वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या "ते" या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविण्यासाठी केलेला आहे.
उदाहरण क्र. २
जो नियम तुला लागू आहे, तो त्यालाही लागू आहे.
या वाक्यामध्ये "जो" हे संबंधी सर्वनाम वापरण्यात आले असून त्याचा उपयोग वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या "तो" या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविण्यासाठी केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
जो जे वांछील, तो ते लाहो.
या वाक्यामध्ये "जो" आणि "जे" ही संबंधी सर्वनामे वापरण्यात आली असून त्यांचा उपयोग वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या "तो" आणि "ते" या दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शविण्यासाठी केलेला आहे.