सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय?
ज्या सर्वनामाचा उपयोग मराठी वाक्यामध्ये नेमक्या कोणत्या सर्वनामाच्या अर्थाने केलेला आहे हे जेव्हा निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे –
कायकोणीकोणालाकोणाची
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
कोणी कोणाला हसू नये.
या वाक्यामध्ये कोणी आणि कोणाला या दोन्हीही सर्वनामांचा उपयोग नेमका कुठल्या व्यक्तीविषयी केला आहे, हे अनिश्चित आहे. त्यामुळे त्यांना हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणून संबोधले जाते.
उदाहरण क्र. २
कोणी कोणाची निंदा करू नये.
या वाक्यामध्ये कोणी आणि कोणाची या दोन्हीही सर्वनामांचा उपयोग नेमका कुठल्या व्यक्तीविषयी केला आहे, हे अनिश्चित आहे. त्यामुळे त्यांना हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणून संबोधले जाते.
अनिश्चित आणि प्रश्नार्थक सर्वनामांविषयी विशेष टीप
मराठी व्याकरणामध्ये कोण, कोणी, कोणाला इत्यादी सर्वनामांचा उपयोग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणूनसुद्धा करण्यात येतो. हि सर्वनामे अनिश्चित आहेत कि प्रश्नार्थक आहेत, हे समजण्यासाठी वाक्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्यानुसार या सर्वनामांचे वर्गीकरण करावे.