निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविते, त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
तो रोज न चुकता व्यायाम करतो.
या वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
न च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.
तो (कर्ता) व्यायाम करण्याच्या क्रियेमध्ये कधीही चुकत नाही किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.
त्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
निमिषने न थांबता सायकल चालवली.
या वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
न च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.
निमिष (कर्ता) सायकल चालवण्याची क्रिया अविरतपणे करत आहे किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.
त्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
रोहितने न कंटाळता संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली.
या वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
न च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.
रोहितने (कर्ता) प्रश्नपत्रिका सोडवण्याची क्रिया करताना अजिबात कंटाळा केला नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.
त्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
नंदिनीने न चुकता विजेचे बिल भरले.
या वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
न च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.
नंदिनी (कर्ता) विजेचे बिल भरण्याच्या क्रियेमध्ये कधीही चुकत नाही किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.
त्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
आईने आराम न करता दिवाळीचा फराळ बनवला.
या वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
न च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.
आईने (कर्ता) आराम करण्याऐवजी फराळ बनवण्याची क्रिया केली, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.