कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याची 'वेळ' किंवा 'काळ' दर्शविते, त्याला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
वाक्यातील उपयोग
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- अजित काल गावाला गेला होता.
या वाक्यामध्ये कर्त्याची गावाला जाण्याची क्रिया केव्हा घडली आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी 'काल' हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
'काल' या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची वेळ समजते.
त्यामुळे, 'काल' या शब्दाला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
- मीना दररोज बागेत जाते.
या वाक्यामध्ये कर्त्याची बागेत जाण्याची क्रिया केव्हा घडते, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी 'दररोज' हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
'दररोज' या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचा काळ समजतो.
त्यामुळे, 'दररोज' या शब्दाला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
अभिजीत सतत गाणं गुणगुणत असतो.
या वाक्यामध्ये कर्त्याची गाणं गुणगुणण्याची क्रिया केव्हा घडते, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी 'सतत' हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
'सतत' या शब्दामुळे वाक्यातील क्रिया किती काळ घडते, हे समजते.
त्यामुळे, 'सतत' या शब्दाला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
- विवेक पूर्वी सदरा घालत असे.
या वाक्यामध्ये कर्त्याची सदरा घालण्याची क्रिया केव्हा घडते, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी 'पूर्वी' हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
'पूर्वी' या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची वेळ समजते.
त्यामुळे, 'पूर्वी' या शब्दाला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
- मी नित्यनेमाने प्रार्थना करतो.
या वाक्यामध्ये कर्त्याची प्रार्थना करण्याची क्रिया केव्हा घडते, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी 'नित्यनेमाने' हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
'नित्यनेमाने' या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचा काळ समजतो.
त्यामुळे, 'नित्यनेमाने' या शब्दाला 'कालवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात.