नञ तत्पुरूष समास
'नञ तत्पुरूष समास' म्हणजे काय?
ज्या तत्पुरूष समासामध्ये पहिले पद नेहमी नकारार्थी असते, त्या समासाला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
समासाची काही वैशिष्ट्ये
नञ तत्पुरूष समासाची काही वैशिष्ट्ये
- नञ तत्पुरूष समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते.
- या समासातील पहिले पद हे नेहमी नकारार्थी असते.
- या समासातील पहिले पद हे नेहमीे 'अ', 'ना', 'बे', 'नि', 'गैर', 'न' यांसारखे निषेधात्मक किंवा नकार दर्शविणारे असते.

समासाची काही उदाहरणे
नञ तत्पुरूष समासाची काही उदाहरणे
उदाहरण क्र. १
- असहकार = सहकार न करणे
'असहकार' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सहकार न करणे' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'अ' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'सहकार' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
- अहिंसा = हिंसा न करणे
'अहिंसा' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'हिंसा न करणे' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'अ' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'हिंसा' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
- असहमत = सहमत नसलेला
'असहमत' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'सहमत नसलेला' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'अ' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'सहमत' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
- नापसंत = पसंत नसणे
'नापसंत' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पसंत नसणे' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'ना' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'पसंत' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
- नाइलाज = इलाज नसलेला
'नाइलाज' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'इलाज नसलेला' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'ना' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'इलाज' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ६
- नाकर्ता = कामाचा नसलेला
'नाकर्ता' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'कामाचा नसलेला' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'ना' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'कर्ता' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ७
- बेशिस्त = शिस्त नसलेला
'बेशिस्त' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'शिस्त नसलेला' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'बे' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'शिस्त' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ८
- गैरहजर = हजर नसलेला
'गैरहजर' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'हजर नसलेला' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'गैर' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'हजर' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.
उदाहरण क्र. ९
- गैरसमज = चुकीचा समज
'गैरसमज' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'चुकीचा समज' हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद 'गैर' हे नकारार्थी आहे.
तसेच, या सामासिक शब्दातील दुसरे पद 'समज' हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे त्याला 'नञ तत्पुरूष समास' असे म्हणतात.