अलुक् तत्पुरूष समास

तत्पुरूष समासाचे प्रकार

'अलुक्' म्हणजे लोप न पावणारा होय.

ज्या विभक्ती तत्पुरूष समासामध्ये पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्याला 'अलुक् तत्पुरूष समास' असे म्हणतात.

समासाची काही वैशिष्ट्ये

अलुक् तत्पुरूष समासाची काही वैशिष्ट्ये

  • अलुक् तत्पुरूष समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामध्ये पहिल्या पदाच्या सामासिक शब्दाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही.
  • या समासामध्ये संस्कृतमधील शब्दांची रूपे आढळतात.
  • या समासामध्ये सप्तमी विभक्तीची उदाहरणे आणि प्रत्यय असणारे शब्द जास्त प्रमाणात दिसून येतात.
समासाची काही उदाहरणे

अलुक् तत्पुरूष समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • पंकेरूह = पंकातला रूह

'पंकेरूह' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पंकातला रूह' हा त्याचा विग्रह आहे.

पंकेरूह हा मूळ संस्कृत शब्द आहे.

  • पंकज = कमळ
  • रूह = उगवणारा

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते 'पंके = पंक + ए' अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये 'ए' या तृतीया विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला 'अलुक् तत्पुरूष समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • तोंडीलावणे = तोंडी लावणे

'तोंडीलावणे' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'तोंडी लावणे' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते 'तोंडी = तोंड + ई' अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये 'ई' या सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला 'अलुक् तत्पुरूष समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • कर्तरीप्रयोग = कर्तरी प्रयोग

'कर्तरीप्रयोग' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'कर्तरी प्रयोग' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते 'कर्तरी = कर्त + र + ई' अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये 'ई' या सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला 'अलुक् तत्पुरूष समास' असे म्हणतात.

विभक्ती तत्पुरूष समास उपपद तत्पुरूष समास

This educational article was first posted on and last updated on by