सहबहुव्रीही समास

बहुव्रीही समासाचे प्रकार

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' यांपैकी एखादे अव्यय असून ते अव्यय एखाद्या विशेषणासारखे कार्य करते, तेव्हा त्या बहुव्रीही समासाला 'सहबहुव्रीही समास' असे म्हणतात.

'सहबहुव्रीही समास' म्हणजे काय?

सहबहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

सहबहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

  • सहबहुव्रीही समास हे प्रथमतः बहुव्रीही समासाचे उदाहरण असले पाहिजे.
  • या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतात.
  • या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
  • या समासामधील पहिले पद हे 'सह' किंवा 'स' यांपैकी एखादे अव्यय असते.
  • या समासामधील पहिल्या पदातील अव्यय हे एखाद्या विशेषणासारखे कार्य करते.
सहबहुव्रीही समासाची काही उदाहरणे

सहबहुव्रीही समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • सबल = बलाने सहित

'सबल' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'बलाने सहित' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे त्याला 'सहबहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • सहपरिवार = परिवारा सहित

'सहपरिवार' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'परिवारा सहित' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पहिले पद ‘सह’ असे येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे त्याला 'सहबहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • सपत्नीक = पत्नी सहित

'सपत्नीक' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'पत्नी सहित' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे त्याला 'सहबहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • सादर = आदराने सहित

'सादर' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'आदराने सहित' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे त्याला 'सहबहुव्रीही समास' असे म्हणतात.

सहबहुव्रीही समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
सत्वरत्वरे सह
सहकुटुंबकुटुंबाने सहित
नञ बहुव्रीही समास प्रादिबहुव्रीही समास

This educational article was first posted on and last updated on by