नञ बहुव्रीही समास

बहुव्रीही समासाचे प्रकार

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते, त्या बहुव्रीही समासाला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

'नञ बहुव्रीही समास' म्हणजे काय?

'नञ बहुव्रीही समास' म्हणजे काय?

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते, त्या बहुव्रीही समासाला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

नञ बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

नञ बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

  • नञ बहुव्रीही समास हे प्रथमतः बहुव्रीही समासाचे उदाहरण असले पाहिजे.
  • या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतात.
  • या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
  • या समासामधील पहिले पद हे 'अ', 'अन्', 'न', 'नि' असे नकारदर्शक असते.
नञ बहुव्रीही समासाची काही उदाहरणे

नञ बहुव्रीही समासाची काही उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • अखंड = नाही खंड ज्याला असे ते

'अखंड' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'नाही खंड ज्याला असे ते' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘अ’ आणि ‘खंड’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘अ’ (नाही) हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे त्याला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • नीरस = नाही रस ज्यात ते

'नीरस' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'नाही रस ज्यात ते' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नी’ आणि ‘रस’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नी’ (नाही) हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे त्याला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • अनियमित = नाही नियमित असे ते

'अनियमित' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'नाही नियमित असे ते' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘अ’ आणि ‘नियमित’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘अ’ (नाही) हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे त्याला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • निबुद्ध = नाही बुद्धी ज्याला असा तो

'निबुद्ध' हा एक सामासिक शब्द आहे, तर 'नाही बुद्धी ज्याला असा तो' हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नि’ आणि ‘बुद्धी’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नि’ (नाही) हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे त्याला 'नञ बहुव्रीही समास' असे म्हणतात.

नञ बहुव्रीही समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
निर्मलनाही मळ ज्यात असे ते
निर्धननाही धन ज्याच्यापाशी असा तो
निर्बलनाही बळ ज्यात असा तो
अज्ञानीनाही ज्ञान ज्याला असा तो
अव्ययनाही व्यय ज्यात असे ते
निरोगीनाही रोगी असा तो
अकर्मकनाही कर्म ज्याला असे ते
निष्कांचननाही कांचन (सोने) ज्याच्यापाशी असा तो
विभक्ती बहुव्रीही समास सहबहुव्रीही समास

This educational article was first posted on and last updated on by