कर्तरी प्रयोग

प्रयोगाचे प्रकार

क्रियापद, वचन आणि लिंग हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून प्रयोग आणि त्याचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

कर्तरी प्रयोग

वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात.

ज्या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलते, त्यास ‘कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.

कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये

  • कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा कर्त्याशी संबंध येतो.
  • या प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, पुरूष तसेच वचनाप्रमाणे बदलते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

तो शाळेत जातो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्तरी प्रयोग’ आहे.

वाक्यातील कर्त्याचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.

ती शाळेत जाते.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हा पुल्लिंगी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘जातो’ हे आहे.

परंतु, पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘ती’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘जाते’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते.

ते शाळेत जातात.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हा एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘जातो’ हे आहे.

परंतु, एकवचनी कर्त्याच्या ठिकाणी ‘ते’ हे कर्त्याचे अनेकवचनी रूप ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘जातात’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या वचनाप्रमाणे बदलते.

तू शाळेत जातोस.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हा तृतीय पुरूषी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘जातो’ हे आहे.

परंतु, तृतीय पुरूषी कर्त्याच्या ठिकाणी ‘तू’ हा द्वितीय पुरूषी कर्ता ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘जातोस’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या पुरूषाप्रमाणे बदलते.

तो शाळांमध्ये जातो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्म ‘शाळेत’ हे आहे तर वाक्यातील क्रियापद ‘जातो’ हे आहे.

या कर्माच्या ठिकाणी ‘शाळांमध्ये’ हे अनेकवचनी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘जातो’ असेच राहते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलत नाही.

उदाहरण क्र. २

रवी पंखा पुसतो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्तरी प्रयोग’ आहे.

वाक्यातील कर्त्याचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.

संगीता पंखा पुसते.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘रवी’ हे पुल्लिंगी नाम आहे, तर वाक्यातील क्रियापद ‘पुसतो’ हे आहे.

परंतु, पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘संगीता’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘पुसते’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते.

ते पंखा पुसतात.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘रवी’ हा एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘पुसतो’ हे आहे.

परंतु, एकवचनी कर्त्याच्या ठिकाणी ‘ते’ हे कर्त्याचे अनेकवचनी रूप ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘पुसतात’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या वचनाप्रमाणे बदलते.

तू पंखा पुसतोस.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘रवी’ हा तृतीय पुरूषी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘पुसतो’ हे आहे.

परंतु, तृतीय पुरूषी कर्त्याच्या ठिकाणी ‘तू’ हा द्वितीय पुरूषी कर्ता ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘पुसतोस’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या पुरूषाप्रमाणे बदलते.

रवी पंखे पुसतो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्म ‘पंखा’ हे आहे तर वाक्यातील क्रियापद ‘पुसतो’ हे आहे.

या कर्माच्या ठिकाणी ‘पंखे’ हे अनेकवचनी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘पुसतो’ असेच राहते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलत नाही.

उदाहरण क्र. ३

तो चित्र काढतो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्तरी प्रयोग’ आहे.

वाक्यातील कर्त्याचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.

विशाखा चित्र काढते.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हे पुल्लिंगी सर्वनाम आहे, तर वाक्यातील क्रियापद ‘काढतो’ हे आहे.

परंतु, पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘विशाखा’ हे स्त्रीलिंगी नाम कर्ता म्हणून ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘काढते’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते.

मुले चित्र काढतात.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हा एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘काढतो’ हे आहे.

परंतु, एकवचनी कर्त्याच्या ठिकाणी ‘मुले’ हे अनेकवचनी नाम कर्ता म्हणून ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘काढतात’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या वचनाप्रमाणे बदलते.

तुम्ही चित्र काढता.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्ता ‘तो’ हा तृतीय पुरूषी आहे तर वाक्यातील क्रियापद ‘काढतो’ हे आहे.

परंतु, तृतीय पुरूषी कर्त्याच्या ठिकाणी ‘तुम्ही’ हा द्वितीय पुरूषी कर्ता ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘काढता’ असे बदलते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या पुरूषाप्रमाणे बदलते.

तो चित्रे काढतो.
(कर्ता) (कर्म) (क्रियापद)

मूळ वाक्यातील कर्म ‘चित्र’ हे आहे तर वाक्यातील क्रियापद ‘काढतो’ हे आहे.

या कर्माच्या ठिकाणी ‘चित्रे’ हे अनेकवचनी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘काढतो’ असेच राहते.

म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलत नाही.

This article has been first posted on and last updated on by