क्रियापद, वचन आणि लिंग हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून प्रयोग आणि त्याचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
कर्मणी प्रयोग
वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात.
ज्या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग आणि वचन यांप्रमाणे बदलते, त्यास ‘कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.
कर्मणी प्रयोगाची काही वैशिष्ट्ये
- कर्मणी प्रयोगात क्रियापदाचा संबंध वाक्यातील कर्माशी येतो.
- कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग तसेच वचनाप्रमाणे बदलते.
- कर्मणी प्रयोगात वाक्याचा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप बदलत नाही.
- कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते.
- कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमान्त असते तसेच कर्ता तृतीयान्त, चतुर्थ्यन्त, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययात असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
मुलाने | पुस्तक | घेतले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्मणी प्रयोग’ आहे.
वाक्यातील कर्माचे लिंग, वचन बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.
मुलाने | वही | घेतलीे. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘पुस्तक’ हे पुल्लिंगी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘घेतले’ असे आहे.
परंतु, पुल्लिंगी कर्माच्या ठिकाणी ‘वही’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘घेतली’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगाप्रमाणे बदलते.
मुलाने | पुस्तके | घेतली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘पुस्तक’ हे एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘घेतले’ हे आहे.
परंतु, एकवचनी कर्माच्या ठिकाणी ‘पुस्तके’ हे कर्माचे अनेकवचनी रूप ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘घेतली’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलते.
मुलीने | पुस्तक | घेतले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मुलांनी | पुस्तक | घेतले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘मुलाने’ हे एकवचनी पुल्लिंगी नाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘घेतले’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘मुलीने’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘घेतले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘मुलांनी’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘घेतले’ असेच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे बदलत नाही.
उदाहरण क्र. २
तिने | गाणे | म्हटले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्मणी प्रयोग’ आहे.
वाक्यातील कर्माचे लिंग, वचन बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.
तिने | कविता | म्हटली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘गाणे’ हे नपुंसकलिंगी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘म्हटले’ असे आहे.
परंतु, या कर्माच्या ठिकाणी ‘कविता’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘म्हटली’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगाप्रमाणे बदलते.
तिने | गाणी | म्हटली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘गाणे’ हे एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘घेतले’ असे आहे.
परंतु, एकवचनी कर्माच्या ठिकाणी ‘गाणी’ हे कर्माचे अनेकवचनी रूप ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘म्हटली’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलते.
त्याने | गाणे | म्हटले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
त्यांनी | गाणे | म्हटले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘तिने’ हे एकवचनी स्त्रीलिंगी सर्वनाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘म्हटले’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘त्याने’ हा पुल्लिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘म्हटले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘त्यांनी’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘म्हटले’ असेच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे बदलत नाही.
उदाहरण क्र. ३
ताईने | रांगोळी | काढली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
वरील वाक्याचा प्रयोग हा ‘कर्मणी प्रयोग’ आहे.
वाक्यातील कर्माचे लिंग, वचन बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते.
ताईने | चित्र | काढले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘रांगोळी’ हे स्त्रीलिंगी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘काढली’ असे आहे.
परंतु, या कर्माच्या ठिकाणी ‘चित्र’ हे नपुंसकलिंगी कर्म ठेवल्यास क्रियापदाचे रूप ‘काढले’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगाप्रमाणे बदलते.
ताईने | रांगोळ्या | काढल्या. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘रांगोळी’ हे एकवचनी आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘काढली’ असे आहे.
परंतु, एकवचनी कर्माच्या ठिकाणी ‘रांगोळ्या’ हे कर्माचे अनेकवचनी रूप ठेवल्यास त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘काढल्या’ असे बदलते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या वचनाप्रमाणे बदलते.
दादाने | रांगोळी | काढली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मुलांनी | रांगोळी | काढली. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘ताईने’ हे एकवचनी स्त्रीलिंगी सर्वनाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘काढली’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘दादाने’ हा पुल्लिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘काढली’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘मुलांनी’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘काढली’ असेच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे बदलत नाही.