विकल्पचिन्ह


विरामचिन्हांचे प्रकार



विकल्पचिन्ह

( / ) हे विकल्पचिन्ह आहे.

विकल्पचिन्ह हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.

मराठी वाक्यात एकापेक्षा अधिक पर्याय दर्शविण्यासाठी त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह वापरले जाते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

विद्यार्थ्यांनी प्रगतीपुस्तकावर आईची / वडिलांची स्वाक्षरी आणावी.

वरील वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी आईची किंवा वडिलांची स्वाक्षरी आणावी, हे दर्शविण्यासाठी विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

या वाक्यामध्ये आईची आणि वडिलांची हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

उदाहरण क्र. २

गोरक्ष उद्या रेल्वेने / बसने गावी जाईल.

वरील वाक्यामध्ये गोरक्ष रेल्वेने किंवा बसने गावी जाईल, हे दर्शविण्यासाठी विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

या वाक्यामध्ये रेल्वेने आणि बसने हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ३

सोमवारी सर्वांनी फुलाचे / फळाचे चित्र काढून आणावे.

वरील वाक्यामध्ये सर्वांनी फुलाचे किंवा फळाचे चित्र काढून आणावे, हे दर्शविण्यासाठी विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

या वाक्यामध्ये फुलाचे आणि फळाचे हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

उदाहरण क्र. ४

वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये / इंग्रजीमध्ये / हिंदीमध्ये निबंध लिहायला सांगितला आहे.

वरील वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये निबंध लिहायला सांगितला आहे, हे दर्शविण्यासाठी विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

या वाक्यामध्ये मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये हे तीन पर्याय असून त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह ( / ) वापरले आहे.

This article has been first posted on and last updated on by