मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘विरजण पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- विरस होणे
- उत्साह कमी होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
आजारपणामुळे स्पर्धेत भाग घेता न आल्यामुळे अभिजीतच्या उत्साहावर विरजण पडले.
वरील वाक्यात असे दिसते की आजारपणामुळे स्पर्धेत भाग घेता न आल्यामुळे अभिजीतचा विरस झाला.
हे दर्शविण्यासाठी विरस होणे या ऐवजी विरजण पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फिरायला जाता येणार नाही म्हणून प्रियाच्या उत्साहावर विरजण पडले.
वरील वाक्यात असे दिसते की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फिरायला जाता येणार नाही म्हणून प्रियाचा विरस झाला.
हे दर्शविण्यासाठी विरस होणे या ऐवजी विरजण पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
ऐन सणाच्या वेळी मंदिर बंद असल्यामुळे सर्व भक्तांच्या आनंदावर विरजण पडले.
वरील वाक्यात असे दिसते की ऐन सणाच्या वेळी मंदिर बंद असल्यामुळे सर्व भक्तांचा विरस झाला.
हे दर्शविण्यासाठी विरस होणे या ऐवजी विरजण पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘विरजण पडणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
टाळेबंदीमुळे सर्व दुकाने बंद राहिल्याने खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले.
-
काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
-
पावसामुळे गरबा खेळता न आल्याने तरूणाईच्या उत्साहावर विरजण पडले.
-
यंदा सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे होळीच्या उत्सवावर विरजण पडले.