पृथकवाचक विशेषण म्हणजे काय?

जे संख्याविशेषण त्याचा मूळ अर्थ न दर्शविता वेगळ्या अर्थाचा बोध करून देते, त्या संख्याविशेषणाला पृथकवाचक विशेषण असे म्हणतात.

पृथकवाचक विशेषणामध्ये एकच गणनावाचक विशेषण दोन वेळा वापरलेले असते.

मराठी व्याकरणातील काही पृथकवाचक विशेषणे –

एक-एक
दोन-दोन
तीन-तीन
चार-चार

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांचे पाच-पाच गट करावयाचे आहेत.

या वाक्यामध्ये विद्यार्थांचे पाच-पाच गट करावयास सांगितले आहेत.

पाच-पाच असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

उदाहरण क्र. २

प्रत्येक गटातून तीन-तीन मुले पुढे या.

या वाक्यामध्ये तीन-तीन मुलांना पुढे येण्यास सांगितले आहेत.

तीन-तीन असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

उदाहरण क्र. ३

खालीलपैकी प्रत्येकी चार-चार प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे.

या वाक्यामध्ये चार-चार प्रश्न सोडविण्यास सांगितले आहेत.

चार-चार असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

This article has been first posted on and last updated on by