उपपद तत्पुरूष समास

तत्पुरूष समासाचे प्रकारसमास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

उपपद तत्पुरूष समास

जेव्हा तत्पुरूष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असून ते एखादे धातुसाधित म्हणून त्या शब्दात येते आणि या दुसऱ्या पदाचा वाक्यामध्ये स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही, तेव्हा अशा समासाला उपपद तत्पुरूष समास किंवा कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उपपद तत्पुरूष समासाची काही वैशिष्ट्ये

  • उपपद तत्पुरूष समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते.
  • या समासातील दुसरे पद हे एखादे धातुसाधित (धातूचे साधित रूप) किंवा कृदंत असते.
  • या समासातील दुसऱ्या पदातील धातुसाधिताचा वाक्यामध्ये स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.
  • या समासातील दुसऱ्या पदातील धातूचे साधित रूप हे पुल्लिंगी एकवचनामध्ये प्रकट होते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

शेतकरी = शेती करणारा

शेतकरी हा एक सामासिक शब्द आहे, तर शेती करणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ करी ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद पुल्लिंगी एकवचनामध्ये असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

कृतज्ञ = उपकाराची जाणीव असणारा

कृतज्ञ हा एक सामासिक शब्द आहे, तर उपकाराची जाणीव असणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ ज्ञ ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद पुल्लिंगी एकवचनामध्ये असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

कथाकार = कथा करणारा

कथाकार हा एक सामासिक शब्द आहे, तर कथा करणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ कार ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद पुल्लिंगी एकवचनामध्ये असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

मार्गस्थ = मार्गावर असलेला

मार्गस्थ हा एक सामासिक शब्द आहे, तर मार्गावर असलेला हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ स्थ ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद पुल्लिंगी एकवचनामध्ये असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

माळकरी = माळ घातलेला

माळकरी हा एक सामासिक शब्द आहे, तर माळ घातलेला हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ करी ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद पुल्लिंगी एकवचनामध्ये असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ६

ग्रंथकार = ग्रंथ लिहिणारा

ग्रंथकार हा एक सामासिक शब्द आहे, तर ग्रंथ लिहिणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ कार ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद धातुसाधित असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ७

कृतघ्न = उपकार विसरणारा

कृतघ्न हा एक सामासिक शब्द आहे, तर उपकार विसरणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ घ्न ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद धातुसाधित असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ८

भाजीविक्या = भाजी विकणारा

भाजीविक्या हा एक सामासिक शब्द आहे, तर भाजी विकणारा हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील दुसरे पद  “ विक्या ”  हे महत्वाचे असून ते एक धातुसाधित आहे.

तसेच, हे पद धातुसाधित असून या पदाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही.

त्यामुळे या समासास उपपद / कृदंत तत्पुरूष समास असे म्हणतात.

This article has been first posted on and last updated on by