अलुक् तत्पुरूष समास


तत्पुरूष समासाचे प्रकारसमास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

अलुक् तत्पुरूष समास

अलुक् म्हणजे लोप न पावणारा होय.

ज्या विभक्ती तत्पुरूष समासामध्ये पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्याला अलुक् तत्पुरूष समास असे म्हणतात.

अलुक् तत्पुरूष समासाची काही वैशिष्ट्ये

  • अलुक् तत्पुरूष समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामध्ये पहिल्या पदाच्या सामासिक शब्दाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही.
  • या समासामध्ये संस्कृतमधील शब्दांची रूपे आढळतात.
  • या समासामध्ये सप्तमी विभक्तीची उदाहरणे आणि प्रत्यय असणारे शब्द जास्त प्रमाणात दिसून येतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

पंकेरूह = पंकातला रूह

पंकेरूह हा एक सामासिक शब्द आहे, तर पंकातला रूह हा त्याचा विग्रह आहे.

पंकेरूह हा मूळ संस्कृत शब्द आहे.

  • पंकज = कमळ
  • रूह = उगवणारा

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते  “ पंके = पंक + ए ”  अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये  “ ए ”  या तृतीया विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला अलुक् तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

तोंडीलावणे = तोंडी लावणे

तोंडीलावणे हा एक सामासिक शब्द आहे, तर तोंडी लावणे हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते  “ तोंडी = तोंड + ई ”  अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये  “ ई ”  या सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला अलुक् तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

कर्तरीप्रयोग = कर्तरी प्रयोग

कर्तरीप्रयोग हा एक सामासिक शब्द आहे, तर कर्तरी प्रयोग हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पूर्वपद लक्षात घेतल्यास ते  “ कर्तरी = कर्त + र + ई ”  अशाप्रकारे लिहिता येते.

तसेच, पूर्वपदामध्ये  “ ई ”  या सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही.

त्यामुळे त्याला अलुक् तत्पुरूष समास असे म्हणतात.

This article has been first posted on and last updated on by